स्त्रियांना जागरुक व सक्षम होण्याची गरज आहे - महापौर किशोरीताई पेडणेकर

स्त्रियांना जागरुक व सक्षम होण्याची गरज आहे - महापौर किशोरीताई पेडणेकर


स्त्रियांना जागरुक व सक्षम मुंबई, दि. ३ (प्रतिनिधी) : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे संस्थेच्या मुंबई शाखेच्या वतीने सायन येथील साधना विद्यालयात ४० वे कवी संमेलन उत्साहात पार पडले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित केला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कवींनी हजेरी लावली. मी मराठी, माझी मराठी, प्रेम, भक्ती, शेतकरी, मन, लावण्य, आई, पाऊस, विरह इ. विषयांवर एकूण ७३ कविता सादर करण्यात आल्या... ___संमेलनाचे उदघाटन मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुंबई महापालिका उपशिक्षणाधिकारी किर्तीवर्धन किातळटवे अ भा म प चे मंबईचे पदेशाध्यक्ष डॉ. जयप्रकाश घमटकर उर्फ गोलघमट, प्रशासकीय अधिकारी (शाळा) कैलास आर्य, मंबई प्रदेश उपाध्यक्षा ललीता गवांदे व साधना विद्यालयाचे सचिव चंद्रकांत खोपडे हे उपस्थित होते. महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी सांगितले की, स्त्रियांनी जागरुक व सक्षम होण्याची गरज आहे. आपला संस्कारांचा वसा पुढच्या पिढीत संक्रमित करायला हवा. बहिणाबाईंच्या कविता आम्हाला आवडतात. उपशिक्षणाधिकारी किरतकुडवे यांनी बालपणीची कविता गाऊन उपस्थितांच्या आठवणींना उजाळा दिला. समाजातील अनिष्ट रुढी व परंपरा यावर हल्ला चढवुन समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचे काम लेखक व कवी आपल्या लेखणीच्या माध्यमातून करत जागतिक महिला दिनी


 



असतात असेही सांगितले. डॉ. घुमटकर यांनी स्त्री सबलीकरण व समाजातील सर्व स्तरातील भ्रष्टाचारावर भाष्य केले. कवींनी विविध सामाजिक प्रश्नांवर आधारित विषयांवर सुंदर सादरीकरण केले. भारत कवितके यांची 'नाम विठोबा रुक्मिणीचे घेऊ', आशा ब्राह्मणे यांची 'अक्रोश', लता पाटील यांची 'आयुष्य', राजश्री बोहरा यांची 'बैठक', डॉ. जयप्रकाश घुमटकर यांची 'गुलाम', अशोक कांबळे यांची 'आदर्श नारी', सोनम ठाकूर यांची 'माझी मराठी भाषा', धनाजी जाधव यांची 'कोंडून जात होता शहरात जीव माझा' या कविता विशेष दाद देऊन गेल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लता गायकवाड, वषाली बांगर. रेखा राणे. सधा दंडवते. विद्या जगदाळे. भोईर काका. पगारे सर, राजेश कांबळे, मीना पगारे, आशा ब्राम्हणे व सचिन निवल यांनी मेहनत घेतली सत्रसंचालन पसिट निवेटिका राजश्री बोरग यांनी केले तर प्रास्ताविक व शेवटी सर्वांचे आभार कल्याण शहर उपाध्यक्षा रंजना पाटील यांनी मानले. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला